STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

परीस

परीस

1 min
229

जीवनात अनेक नाते आहेत

आई वडील बहीण भाऊ

दुसरं असं ही एक नातं आहे

ज्यात सर्व काही विसरून जाऊ


परिवारात मिळतात सारे हे

पण हा काही दिसत नाही

घराबाहेर पडल्याशिवाय

त्याची गाठ पडत नाही


आपल्या मनातल्या भावना

आपण कोणाला सांगत असतो

दुःख असो वा असो सुख

फक्त त्यालाच तर कळवितो


तो नसेल जीवनात तर

जीवन सारे शुन्य सारखे

त्याचे नाव आहे मित्र

तो आहे परिसा सारखे



साहित्याला गुण द्या
लॉग इन