STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Others

परी!तू मभासतेस का स्वप्ना परी?

परी!तू मभासतेस का स्वप्ना परी?

1 min
329

काय तुझी गे जादूगरी!

सांगना मजसी तू तरी!!१


आभास की आहे खरी!

नभातून का येते भूवरी!!२


कि सागरातील जलपरी!

कृपा करशी गं आम्हावरी!!


नाव ने की माझी पैलतीरी!

अंगी उठलीयाच शिरशिरी!!४


नकोस उशिर ये पळभरी!

सोसवेना वेदना ये झडकरी!!५


का कपोलकल्पित कथेपरी!

पंखांची नक्षी किती मनोहारी!!६


प्रिये तू मज संकटातून तारी!

आहे मी एक दैवाधिन नारी !!७


कर उघडी बंद द्वार ती सारी!

शोधता तुला दमले दिशा चारी!!८


आता तरी माझा उद्धार करी!

परी,का मज भासते स्वप्ना परी!!९



साहित्याला गुण द्या
लॉग इन