प्रेरणादायी माॅ जिजाई
प्रेरणादायी माॅ जिजाई
स्वराज्याची ती असे हो आई
आपली प्रेरणादायी माॅ जिजाई ॥धृ॥
विचारशील ती खुप हो ज्ञानी
संस्कारशील ती राजमाता होती
धैर्यशील ती खुप धाडसी
निडरवृत्तीची कतृत्वानं स्त्री ॥१॥
सार्या विश्वाची ती हो माऊली
रयतेविषयी तिला आत्मियता होती
जणतेविषयी तीच्या मनात असे अपुलकी
सार्या रयतेला ती प्रोत्साहन देई ॥२॥
स्वराज्याला तिने साथ हो दिली
सोन्याच्या नांगराने शेती हो केली
तिची स्वराज्याशी असे बांधिलकी
निर्भिडपणे खंबीर भुमिका बजावली ॥३॥
स्वराज्याला ती वळण हो देई
मार्गदर्शक शिवबांना ती दिशादर्शक होती
रयतेची माऊली खुप जिद्दी होती
स्वराज्याची माई सार्यांना प्रेरणा देई ॥४॥
राजांची तिने जडणघडण केली
स्वराज्याची आऊ शूरवीर घडवी
स्वराज्य करण्याचा निर्धार असे मनी
विश्वाचे हित पुत्रांच्या मनात हो रूजवी ॥५॥
