STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

प्रेरणा मात्र तुझी....

प्रेरणा मात्र तुझी....

1 min
388

अ आ इ चा पहिला स्वर

अड्खळलेले पहिले पाऊल

आयुष्याची पहिली शाळा

की नोकरीचा पहिला दिवस

जेव्हा जेव्हा माझे पाऊल थबकले

तेव्हा तेव्हा तुच मला सावरले

माझ्या डोळ्यातील अश्रु तू आपलेसे केलेस

चेहर्यावर हसू आनून मला बळ तू दिलेस

कधी आई

कधी बहिण

कधी सन्गिनी

कधी शिक्षिका

माझ्या जिवन प्रवासात तू सोबत राहिलीस

धगधगती एक ज्योत बनून

ह्या दिव्याची वात बनून

हार न मानता मी प्रत्येक संकटावर मात केली

कारण तुझी साथ होती

गौरव माझ्या कर्तुत्वाचा झाला तरी

प्रेरणा मात्र तुझीच होती...


साहित्याला गुण द्या
लॉग इन