प्रेमिक
प्रेमिक
1 min
119
मी प्रेम केले मी प्रेम जगलो
प्रेमामुळे आयुष्यात तगलो
ना केली चिंता ना केला हंगामा,
अखंड प्रेमरंगात रंगलो -१-
जाती धर्माचे अडसर होते
आप्तेष्ट ही मागे सरले होते
प्रेम निभवायची साथ दिली,
सखीच्या करांचे गुंफण होते -२-
जने हेटाळणी केली उपेक्षा
सखीची प्राणपणे केली रक्षा
पडलो नाही तसूभर कमी
घेतला वसा नि प्रेमाची दिक्षा -३-