प्रेमाचा शृंगार
प्रेमाचा शृंगार
1 min
228
अगं माझ्या घरी नाही राशन
वेडा झालो गं पाहून तुझं फॅशन
तू कर दुसऱ्याच्या प्रेमाचा शृंगार....
राणी माझं प्रेम तूझ्यासाठी भंगार
अगं साजणी मी आहे एक बेरोजगार....
रोज वाढतात तुझ्या किती डिमांड
सहन होईना तुझ्या प्रेमाचा रिमांड
खिशात नाही माल झालो चितगार.....
खेड्यातला मी आहे साधारण राजा
तुझा अगाव नखरा वाजवितो बाजा
तुझ्या प्रेमात होईल जीवन थंडगार.....
संगम तुझ्या प्रेमाला गं जोडतो हात
खूप भारी पडते तुझ्या प्रेमाची बात
खेळणार नाही तुझ्या प्रेमाचा जुगार.....
