Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

भास्कर आग्रे

Others

4.0  

भास्कर आग्रे

Others

प्रेमाचा रुसवा

प्रेमाचा रुसवा

1 min
289


लाडाची राणी तू माझी

का रुसलीस माझ्यावर ,

सांग ना प्रेयसी तुझा

विश्वास नाही का प्रेमावर !!

का रुसलीस तू अचानक

सांगशील का मजला ,

नको अबोल राहू ना तू

कसं समाजावू मी तुजला !!

तुझा असा हा अबोलपणा

माझ्या काळजाला भिडतो ,

तुझ्या आठवणीने सारखा

मीच माझ्या मनात रडतो !!

प्रेमात असावे रुसवे फुगवे

कधी मुखी शब्द येती कडवे ,

जीवापाड प्रेमाच्या बंधनात

चेहरे होतात कधी कधी रडवे !!

आपल्या प्रेमाची शपथ तुला

सोडशील ना हा तुझा रुसवा ,

माझ्या जवळ बोलण्यासाठी

चेहरा करशील ना तुझा हसवा !!


Rate this content
Log in