प्रेमाचा रंग
प्रेमाचा रंग
1 min
387
सख्या साजना मी लावला तुझ्या प्रेमाचा रंग
डोळ्यात काजळ लावून शोधे तुला दासी
तूच माझ्या सात जन्माचा सख्या प्रवासी
साधे भोळे नखरे पाहून माझे सारे झाले दंग
माझ्या आशा तुझ्या नावी केल्या
तुझ्या आठवणी ना माझ्या गावी आल्या
माझ्या निर्मळ प्रेमाचा तू करू नको भंग
तुझी शायरी रे माझ्या प्रेमाचा मान
माझ्यावर लिहून तू केला माझा सन्मान
सारे आहेत रे सोबत पण तू ना माझ्या संगं
ह्या वेडीचा श्वास तुझ्यापुढे थांबतो
संगम तूच माझे सुखदुःख जाणतो
गाऊ दे मला जन्मभर तुझ्या प्रेमाचा अभंग
