STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

प्रेमा तुझा रंग कसा"

प्रेमा तुझा रंग कसा"

1 min
253

प्रेमा तुझा रंग कसा

ज्यात आहे अनेक रंग

राग लोभ अती सालस

गोंधळ घाली करती जंग..!!


वेडे मन हे पाखरू होई 

उंच उडते निळ्या नभी 

भेटीसाठी तडफडतांना

फडफड होते अंतरगाभी..!!


कधी कधी मन हसते

कधी कधी मन रडते

श्वासाच्या लहरी मध्ये

अलवार तरंगत असते..!!


मेंदीचा तो मंद सुगंध

श्वासांच्या दरवळात भरतसे

प्रेमाच्या सागर लाटावर

डूंबून डूंबून स्वप्न गिरवतसे ..!!


वेल बुट्यांच्या नक्षीमध्ये

प्रेमाची वीन विलसतसे

रुप लावन्य आरश्यात जणू

 लपून छपून रमतसे..!!


दूर सनईचा सुर ऐकता 

कोमल हृदयाची मूढगती 

श्वासाचे मग अलवार गीत

काळजाची धून धूंदवती..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन