प्रेम..!
प्रेम..!
1 min
423
प्रेम म्हणजे काय
ते एका प्रेयसीला विचारा,
प्रेम म्हणजे काय
ते वाहत्या पाण्याला विचारा,
प्रेम म्हणजे काय
ते मातीच्या गंधाला विचारा,
प्रेम म्हणजे काय
ते दाटलेल्या नभाला विचारा,
प्रेम म्हणजे काय
ते गोठ्यातल्या गायीला विचारा,
आणि,
प्रेम म्हणजे काय
ते घरातल्या आईला विचारा,
मग बघा जीवन प्रेमळ कसे होत नाही ते..!
