प्रेम
प्रेम
प्रेमा विषयी कुणी किती ही
लिहीलं तरी ते कमीच आहे
कारणं आयुष्य जगण्यासाठी
तीन प्रमुख गरजा नंतर व्यक्तीला
गरज असते ती खर्या प्रेमाची.
पण जीवनात आलेल खरं प्रेम
ओळखायला आपण कधी कधी
खूप उशीर करतो
रुक्ष व्यवहारी जगात एखाद्या
सुंदर कोमल स्पर्शा सारखं हे
प्रेम उमलतं बहरतं पण अक्षम्य
दुर्लक्षित होऊन कोमेजूनही जात
असं म्हणतात
आपण कुणालाही तोडू शकतो
पण प्रेमाचे बंधन तोडणं निव्वळ
अशक्य असतं पण आपण नेमके
इथेच चुकतो
इतक्या पवित्र भावनेलाही
व्यवहार, स्वार्थ ह्या गोष्टीचा
मुलामा चढविला जातो आणि
मूळ निखळ निरागस भावना
कलुषित होऊन जाते
आपल्या आयुष्यात आपल्या
साठी आपल्याशी एकरूप
झालेली व्यक्ती कुठल्याही
प्रसंगी तुम्हाला कधीही एकटं
सोडत नाही
तुमची सावली बनून रहाते
कुठल्याही नात्यात चढ उतार
हे असतातच पण वाईट दिवस
आले किवा काही तात्कालिक
वाद झाले तरी खरं प्रेम जोडून
ठेवतं
पण अनेक वेळा आपली दृष्टी
हे प्रेम ओळखायला चुकते
पर्याय निर्माण झाले की अशा
प्रेमाची किंमत आपण अनेकदा
करत नाही
कुठेतरी बुद्धी ही मनावर हावी
होते आणि अशा खर्या प्रेमाच्या
नात्यातून आपण स्वतःला मुक्त
करतो
पण असं मुक्त होण
सोपं असतं का?
कितीही व्यवहार जपला तरी
अंतर्यामी ओढ संपू शकत्ते का?
नेहमीच बुद्धी जे सांगते ते
योग्य असतचं अस नाही
कधी कधी छोट्याशा गोष्टी
ज्या समजुतीने मिटू शकणाऱ्या
असतात त्याला गंभीर समजून
आपणं नातं तोडून टाकतो
पण पुढे जावून आपण इतका
ही कठोर निर्णय घ्यायला नको
होता असं जरं वाटलं तर तुम्ही
नक्कीच त्यांना त्यात खरे
गुंतले होतात हे समजावं
ज्याला तोडल्यावर मनात
वेदनेची कळ उमटते
ज्याच्यासाठी आपला अहंकार,
रागही आपण संयमित करू
शकतो त्या व्यक्तीवर तुमचं खरं
प्रेम असतं आणि ते प्रेमच तुमचं
ही खरं प्रेम असतं हे समजावं
म्हणून असं वाटतं की नशिबाने
मिळालेली अशी गोड माणसं
क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून
टाकू नये कारण काय सांगावं
उद्या सगळं असेल पण
सोबतीला कुणी हक्काने
भांडणार रुसणार आणि
छोट्याशा समजुतीने लगेच
खुदकन हसणार गोड प्रेम
आयुष्यात नसेल
ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा
आत्ताच बागेची काळजी घेणं
केव्हाही चांगलं नाही का?
