प्रेम..!
प्रेम..!
वेडी माणसंच वेड्यागत *प्रेम* करतात,
मग ते माणसांवर असो की प्राण्यांवर..!
त्यांच्या राहणीमानावर जाऊ नका,
त्यांनी *प्रेम* केलयं फक्त जगण्यांवर..!
जिथे माणसाला माणसाची भाषा कळेना,
तिथे जनावर हुंकारा देतो त्यांच्या
बोलण्यावर..!
काहीचं नसते त्याच्यांकडे फाटक्या चिंध्याशिवाय,
तरी ही ते सारं काही देतात आपल्या एका मागण्यावर..!
हसू येतं हे चित्र पाहताना आधी सर्वांनाच पण,
दोरीही बांधून न घेणारे हे श्वान पोती
गुंडाळून घेतात त्या वेड्याच्या एका सांगण्यावर..!
त्यांनी निस्वार्थ *प्रेम* केलंय एकमेकांवर,
कारण त्यांना माहीत आहे कोणी नाही त्यांचं जगताय कसे विचारणारं अन् कोणी नाही रडणारं त्यांच्या मरण्यावर..!
