प्रेम "प्रेमाच वास्तव्य"
प्रेम "प्रेमाच वास्तव्य"
1 min
380
मी माणसावर प्रेम करण्याऐवजी
मी झाडावर प्रेम करेन...
कारण ते मला कधी सोडून जाणार नाही.
मी माणसांशी प्रेमाची गोष्टी करण्यापेक्षा
मी पक्षीचे स्वर ऐकेन....
कारण ते कधी बेसूर होणार नाहीत.
मी माणसांशी मैत्री करण्याऐवजी
पशुपाखराशी करेन...
कारण ते कधी माझ्या मनावर आघात करणार नाहीत.
मी माणसांशी नाते जोडण्याऐवजी
मी जमिनीशी नाते जोडेन...
कारण ती कधी नातं तोडन्याची भाषा करणार नाहीत.
समुद्राला पाण्यामुळे जमिनीशी नात तुटत अस वाटल तरी,
पाण्याखलच्या जमिनीचं जगभर अतूट असे नात आहे.
