STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Others

3  

Deepali Thete-Rao

Others

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे...

1 min
411

प्रेम म्हणजे नक्की काय

प्रेम म्हणजे तू...

प्रेम म्हणजे तुझं असणं

प्रेम म्हणजे तुझं बोलणं

प्रेम म्हणजे तुझं असं माझ्यात विरघळून जाणं

प्रेम म्हणजे माझी तुझ्यावरची श्रद्धा

प्रेम म्हणजे स्वीकार....

तुझ्या असण्याचा..

तुझं माझ्या स्वप्नविश्वात वावरण्याचा

प्रेम म्हणजे स्वीकार...

तुझं माझ्याबरोबर नसण्याचा

पण तरीही तुझं असं माझ्यात असण्याचा

कारण..

माझा हृदयातील तुला तू सुद्धा पुसू शकणार नाही

प्रेम म्हणजे विश्वास

श्वासाबरोबर कायम असणारा

प्रेम म्हणजे स्वीकार...

तुझ्यातल्या चांगल्याचा आणि वाईटाचाही

प्रेम म्हणजे स्वीकार...

तुझ्यातल्या गुणांचा

हो कारण..

प्रेमात मला तू अवगुणी भासतच नाही

प्रेम म्हणजे करंट पॉझिटिव्हिटी कडून निगेटिव्हिटी कडे वाहणारा

आणि निगेटिव्हला सावरून पॉझिटिव्ह करणाऱा

प्रेम म्हणजे आठवण

गोड हवीहवीशी...

प्रेम म्हणजे कटुता

साठवण आठवणींची..तरीही ना नकोशी

प्रेम म्हणजे उधळण मनमोही शब्द फुलांची

प्रेम म्हणजे पखरण आभाळभर पसरलेली अव्यक्त भावनांची..

म्हणूनच प्रेम म्हणजे फक्त स्वीकारच......



Rate this content
Log in