STORYMIRROR

Shital Yadav

Others

4  

Shital Yadav

Others

प्रदूषण

प्रदूषण

1 min
400

दिवसेंदिवस वाढतोय सूर्याचा पारा 

वसुंधरेवर होतोय प्रदूषणाचा मारा 


शब्दांतच भासे हिरव्यागार लतावेली

मानवाने सृष्टीची नासाडी अशी केली


जल,वायू, भूमी असो वा ध्वनीप्रदूषण 

सुखासाठीच माणसाने हिरावले भूषण 


कत्तल करून वृक्षांची वसविलीत घरे

भुईच्या गाभारी आटले पाण्याचे झरे


पशुपक्षी जीव पाण्याविना इथे तडपती 

भूखबळी रोजचेच जरी अहोरात्र खपती 


भान ठेवून वास्तवाचे करावा हा निर्धार 

हिरवी करू धरा फेडू निसर्गाचे उपकार 


संकल्प घ्या प्रत्येकाने लावू एकतरी वृक्ष 

स्वर्ग होईल भूवरी राहू हरितक्रांतीस दक्ष 



Rate this content
Log in