STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

प्रार्थना: विधात्याकडे मागणे

प्रार्थना: विधात्याकडे मागणे

1 min
246

जगणे अजून बाकी, उमेदिची कात नवी दे

तेवत राही सदैव, प्रीतीची वात फुलू दे ||१||


सम्राटाची ताकद नको, उभे राहण्याची शक्ती दे

मेहनती माझ्या मनाला, दोन प्रेमाचे घास दे ||२|| 


थोडी सुख शांती, आणि खूप सारं समाधान दे 

संसारापासून विरक्ती नको, पण लालसेवर मात दे ||३|| 


गोंधळल्या क्षणी, सावरण्याची शक्ती दे 

थोडासा संयम आणि, क्रोधापासून मुक्ती दे ||४|| 


हरल्यावर पुन्हा, उठवण्याची ताकद दे 

अहंकार बाजूला ठेवून, मन जिंकण्याची भक्ती दे ||५|| 


Rate this content
Log in