STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

पोलिस कविता

पोलिस कविता

1 min
23.5K


खाकी पोलिस वर्दीचे

अहो आम्ही इमानदार

नाही कुणाचे गुलाम

भाकर कष्टाची खाणार ,


अत्याचारांचे मारक

जनसेवेचे सेवक

उन,पावसात, थंडीत

कार्य नेमाने करणार


जीव तळ हातावर

देशासाठी लढनार

गरीबांच्या हक्कासाठी

आम्ही आयुष्य वेचनार


ध्येय सत्याचे गाठनार

सेवा धरतीची करणार

देशकार्याला वाहनार

ताठमानेने जगणार


कायदा सत्याचा पाळनार

नाही कुणाला झुकनार

स्वाभिमानाने राहणार

रक्षण सत्याचे करणार


साहित्याला गुण द्या
लॉग इन