STORYMIRROR

भरत माळी

Others

3  

भरत माळी

Others

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
12.1K

आषाढीचे वेध, लागे हुरहुर,

किती दूरदूर, रे पंढरी ॥१॥


पंढरीच्या वाटे, वैष्णवांचा मेळा,

सावताचा मळा, बहरला ॥२॥


वारीत रंगले, गौळण भारुड,

विठूचे गारुड, जगावरी ॥३॥


ब्रम्हानंद आज, हरीचा गजर,

भक्तीचा सागर, वाळवंटी ॥४॥


एक तीच आस, तुझ्या दर्शनाची,

होते उद्धाराची, अनुभूती ॥५॥


पाहिला साक्षात, सावळा विठ्ठल,

हर्षिला सकळ, भक्तगण ॥६॥


आता कैसे जावे, माघारीच्या वाटे,

गहिवर दाटे, भाविकांचा ॥७॥



Rate this content
Log in