नशीबना भोग
नशीबना भोग
1 min
234
मिरीगना पानी कधी
हाऊ पडनाच नही,
मन्हा नशीबना भोग
कधी सरनाच नही..१
साले-साल अंत देखी
धोकेबाज पावसाया,
दर वरीस वाढस
दाट दुष्कायनी साया..२
कधी इकी बैलजोडी
कधी बाईना दागिना,
रातदिन राबो तरी
कर्ज फिटता फिटेना..३
सरकार मायबाप
रोज लालूच दावस,
अनुदान कर्जमाफी
यास्नं गाजर दावस..४
देऊ नका कर्जमाफी
नका देऊ अनुदान,
फक्त भाव द्या मालले
मियी आम्ले जीवदान..५
सटीवर पूजी हायी
करमनी ही कहानी
तरी नको हायी फाशी
शोधू दगडमा पानी..६
