STORYMIRROR

भरत माळी

Children Stories

4  

भरत माळी

Children Stories

चिमणीचे लग्न

चिमणीचे लग्न

1 min
250

चिमणी ताईच्या लग्नातही चिव चिव

मनी मावशी पिपाणी वाजे म्याव म्याव


मोर धरी फेर पैजणांची छनछन

हत्ती दादा मंडपात आला दणदण

कावळेबाबा ढोल बडवी काव काव


कोकिळाबाईही सूर धरी कुहू कुहू

गाढव म्हणाले मी पण गाऊन पाहू

बेडूक बॅण्ड वाजवी डराव डराव 


मंडपी नाचू लागले ससोबा कोल्होबा

मांडवात कसा अवतरला वाघोबा ?

जिकडे तिकडे सुरू झाली धावाधाव


Rate this content
Log in