घे उंच भरारी
घे उंच भरारी
1 min
143
नभ पेलण्याची
असावी तयारी
तोड या श्रृंखला
घे उंच भरारी
सावित्रीची लेक
तू रणरागिनी
फुलाची परडी
तेजस्वी दामिनी
झटक ती झुल
फेक ते जोखड
सबलीकरण
जगाची निकड
तू लक्ष्मी घराची
जननी जगाची
संस्कृती रक्षक
मूर्ती संघर्षाची
पिंजरा तोडून
उड मुक्तपणे
जगाशी लढण्या
ये निडरपणे
