STORYMIRROR

purushottam hingankar

Others

2  

purushottam hingankar

Others

पक्षाची पुनर्बांधणी

पक्षाची पुनर्बांधणी

1 min
74

घरी भांडणे ती बाप लेका झाली

जरी वेगळाली झाली तरि!!१!!


संसार तों काय सोडूनिया गेली?

पुन्हा उभी केली सृष्टी तेणे!!!!२!!


तैशा परी राही ठाकोनिया उभा

अंतरीचा गाभा ना डळमळी!!३!!


फांदी मोडीता ते झाडं काय गेले

खचूनिया भले सांग बापा?!!४!!


अंतरी भांडणे झाली असे जरी 

उभा पक्ष करी पुन्हा पुन्हा!!५!!


संतदास म्हणे धरी हिम्मत ती 

उभी पै सृष्टी ती करी राजा!!६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन