STORYMIRROR

प्रविण कावणकर

Children Stories

3  

प्रविण कावणकर

Children Stories

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
201

सकाळच्या वेळी फिरती पाखरं

सुगंध शोधताना दरवळत राहते

सुंदर रंगीत मकरंद शोधत येताना

हवासा वाटणारा गंध शोषून घेते//१//


फुलांनी बहरून आलेल्या बागेमध्ये

रंगीबिरंगी बसलेली ती फुलपाखरं

एकमेकांच्या संगतीन फुलांचा रंग

पाहून सुवास दरवळत घेत ती सांर//२//


निसर्गामध्ये फुलांच्या पाकळ्या

वातावरणात पसरलेल्या दिसतात

त्यांच्यावर तुटून जमलेली पाखरं

आभाळातून मोकळा श्वास घेतात//३//


रंगीत छटा दिसतात झळकताना

पाखरं वाटेतून धाव घेत रानावनात

पखं फुटले गेले चिमुकल्या बाळांना

दवबिंदू पसरे मोकळ्या परिसरात//४//


मातीतूनी रुतला गंध पसरे मऊ

मातीचा स्पर्श करून भटकताना

हळूवार पणें रंग पसरे निसर्गातून

आनंद होतोय उन्हातून फिरताना//५//


Rate this content
Log in