STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
688

मन मोहते, मोहते फुलपाखरू,

क्षणभर थांबजरा देना पंख तुझे.

आकाशी तारांगणात जीवलग दिसे.

घेऊन खुशाली,देईन पंख तुझे.


फुलपाखरू होऊन जरा,मला मिरवू दे.

आठवण येता आईची भूर्रकन भेटून येऊ दे.

मायेच्या कुशीत क्षणभर मोहरू दे.

सासर ते माहेर क्षणाक्षणात भेट घडू दे.


जीवलग मैत्रिणी त्या संसारात गढून.

हितगूज मनातले सांगण्यास कोणी नसे.

हसत खेळत,शिकव बागडावे कसे.

स्वार्थी गणगोताने, काळीज चिरले असे.


जीवन आठवणीचे फुलपाखरू मनमोहक.

बालपणाचे दिवस स्वच्छंदी गेले उडत.

तारूण्यात संघर्षाची घोडदौडेती करत.

म्हातारपण नको नको म्हणत जगत.


मागे वळून पाहते मज दूर जाताना,

प्रेमे तिचे काळीज तुटताना दिसते.

सुखी माझा संसाराच्या मार्गा मार्गावर,

वात्सल्य रूप आठवत, मी पुढे पुढे चालते.


Rate this content
Log in