फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
11.6K
चिमुरडे एक फुलपाखरू
करती मजसी हितगुज
रंगबेरंगी पंख माझे
आहे का सांग तुज
पकडू पाहे मी तुला
लागेना माझ्या हाती
क्षणात इकडे, क्षणात तिकडे
कधी वर तर कधी खाली
नाजूक तू फुलपाखरा
राहा असा मजेत
स्वच्छंदी जीवन जग
राहू नको बंदित
खरोखर मला रे फुलपाखरा
वाटतो तुझा हेवा
दे मलाही असे जीवन
माझ्या रे देवा