STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

फसवे प्रेम

फसवे प्रेम

1 min
12K

प्रेम करणारे या जगात खूप भेटतील 

पण तुझ्या पोटाचा विचार करणारे फार कमी असतील 


बॉय फ्रेंड म्हणून तुझ्या सोबत राहतील 

पण थोड्याच दिवसात कामवासना जागृत करतील 


अनेक बहाने सांगून तुला भेटायला येतील 

पण त्यात हिऱ्या सारखे तुला पारखावे लागतील 


तुझ्या सौंदर्याचे मध चाखायला सगळे येतील 

पण जगण्याला आधार देणारे नसतील 


खोटे प्रेम, प्रतिष्ठा तुला दाखवतील 

खरे आयुष्य जगताना तेच दगड मनाचे होतील 


तुला खोट्या प्रेमात भुलवणारे अनेक भेटतील 

पण कठीण प्रसंगात पळ काढतील 


तुझ्या सुंदरतेला भाळून तुला अनेक स्वप्न दाखवतील 

पण त्यांचे स्वप्न कधीच खरे नसतील 


तुझ्याकडे येऊन शिणभाग काढतील 

पण तू आज जेवली का?हे विचारणारे फार कमी असतील 


अनेकांच्या नजरा तुझ्यावर भाळतील 

पण त्या स्वार्थी आणि खोट्या असतील  


प्रेमात विश्वास, दया, काळीज समजनारेच तुझे असतील 

बाकी तुला सर्व फसवून जाणारे असतील


Rate this content
Log in