STORYMIRROR

Himani Kulkarni

Others

4.8  

Himani Kulkarni

Others

फक्त आरशात डोकावले...!

फक्त आरशात डोकावले...!

1 min
711



मी इतकं म्हणतोयं तर आता थोडं थांबशिल??

तुला नाही बोलायचं ठीक पण माझं ऐकून तर घेशील??

हे बघ फक्त एकदा नजरेला भिडव नजर...

फक्त दोनेक क्षणासाठी सगळ्या जगाला विसर...

मग भाव खात आधी तिरपीच पाहशील...

उगाच पाहून न पाहिल्यासारखं...

पण एकदा का डोळे मिचकावले...


की मग गालात हसून

तुझे डोळेच बोलतील नेहमीसारखं...

खूप झालं लाडीगोडी

आता मी नाही ऐकणार

बघू नकोस असा केविलवाणा

मी चांगलंच सुनावणार

एक तर मला जमत नाही उसनं अवसान घेवून चिडणं

जरा कुठं जमतयं तोवर तुझं असं लाडिक वागणं

खरं सांगू!चिडले नाही रे

खरं फार वाईट वाटतं..


आपलंच माणूस जेव्हा

नसण्याची सवय लावतं...

नियती,परिस्थिती सोडचं

मन पण इतकं विचित्र की

तुझीच घेतं बाजू...

"अगं त्याला कामाच्या व्यापात

नसेल जमलं"असं मलाच

लागतं समजावू...


आता हेच बघ...

हे सारे ऐकण्यासाठी

ना तू मला बोलावलं...

ना मी तूला थांबवलं...

पाठ फिरवून जाण्याआधी

मी फक्त आरशात डोकावलं...!


Rate this content
Log in