Be positive!
Be positive!
1 min
604
दिवा शांत व्हायला अजून आहे अवकाश
अडव जरा वाऱ्याला,दिवा उजळू दे सावकाश!
नको वाटायला अंधारात दिव्याचीच गर्दी
उठ आणि झटकून दे नकारात्मकपणाची वर्दी!
मान्य आहे ना प्रकाशामुळेच मिळते सावली
पण म्हणून असं नको की सावलीच जास्त भावली!
आपणच हरणार, आपणच जिंकणार
सावल्यांचे फक्त खेळ असतात...
प्रकाशापासून लांब जावं लागतं
म्हणूनच त्या गडद बनवायच्या नसतात!
अरे, छोटा काजवा पण
त्याचं अस्तित्व निर्माण करतो..
मग तू तर एवढा धडधाकट
तरी का अंधारात कुढतो?!
झटकून दे हे असे जगणे
पुन्हा नव्याने जगायला झूक...
लागू दे तुज पुन्हा
नवनवीन शिकण्याची भूक!
