STORYMIRROR

Himani Kulkarni

Others

5.0  

Himani Kulkarni

Others

दोस्तांची भेट...!

दोस्तांची भेट...!

1 min
1.2K


तसं ती दोघं कायमच भेटतात

खरं मलाच हल्ली नाही जमत...

पण जोडून सुट्या आल्या की

मग काही कारणं नाहीत चालत...


काय सांगू त्यांच्याबद्दल...

ती क्षणात सगळ्या विश्वाला सामावून

घेणारी तर क्षणार्धात भिरकावून देणारी,

पोटात एक नि ओठावर एक अशी मनस्वी...


तर तो घड्याळ्याचा काट्यावर चालाणारा,

कधी त्याच्याकडे बघायचे कोणी धाडस पण नाही करणार तर कधी त्याच्यावरून नजर

नाही हटणार असा...

जितका विरह सोसतात

तितकी सोबत मिरवतात...


त्याचा पारा चढला की

तिच्यावर व्रण उमटतात...

अन् जाता येता नवख्या

जोडीसारखं बिलगतात...


तर...त्यांच्या भेटीचा नेहमीच

छान जमतो मेळ...

'संध्याकाळी समुद्रकिनारा' ही

ठरलेली जागा नि वेळ...

त्याची सदा second shift मग

लवकर गेले तरच तो भेटणार...


मग त्या रेतीतून मी झपाझप पावले टाकत

खरं रमतगमतच जाणार...

पण एकदा का ती नजरेच्या टप्प्यात आली

की चप्पल अक्षरशः भिरकवणार...

कोणी बघतील!कोणी हसतील!

पर्वा न करता धावतच जाऊन तिला कडकडून भेटणार...


कित्तीदा भेटलोय तरी नेहमी

ह्याचा रंग न्यारा...

काय माहिती कसा जमवून

आणतो हा नजारा...

Hi-Hello करत selfiकाढत

वेळ जातो जरा...

तो गेला की मगच गप्पांचा

फड रंगतो खरा...


काय सांगू काय नको

असं होतं दोघींना नुसत...

रूसवे-फुगवे हसू-आसू

असं मेतकूट जमतं मस्त...


आमच्यातलं बोलणे मात्र

मी नाही हा सांगणार...

सख्यांमधलं गुपित हे

खास कुपितच राहणार...


नको-नकोसे सोडायला लावून

सकारात्मकतेचे धडे घेते गिरवून...

मग माझ्याच प्रश्नांची उत्तरे

माझ्याकडूनच घेते वदवून...


अंधार दाटू लागता 'भेटू परत'

म्हणून निघायचं...

चप्पल शोधायचे म्हणून तिथंच

जरा घुटमळायचं...

मागे वळून पाहता डोळ्यातले तळं

गोठवून घर गाठायचे थेट...

अस्ताला जाणाऱ्या सूर्याची अन् फेसाळलेल्या

लाटेची झालेली असते यंदाची भेट...


Rate this content
Log in