जेव्हा तो समोर येतो...
जेव्हा तो समोर येतो...
तरी हजारदा बजावलं होतं तुला
नको येत जाऊ असा अवचित...
काय म्हणायचं तुला
तु ना परका ना परिचित...
इशारा नुसता देऊन करु नको घाई...
माझं उत्तर ऐकून घ्यायचं की नाही...
नाही जमतं हल्ली...
आधीसारखं तु येण्याआधी बसायला आवरुन...
बघतोस ना माझ्याकडं
किती व्याप ठेवलेत पसरुन...
त्यात जरासं पण दुर्लक्ष
तुला नाही खपत...
मग किती तो आकांड तांडव नि
किती ती आदळाआपट...
तरी नशीब माझं...
नुसतं खिडकीतून पाहीलं
तरी शांत होतोस...
जोरात एकदा गडगडून
माझ्या नावाची एक सर
खिडकीत पाठवून देतोस...
मग काय...
मन्मनीचे संवाद पोहचतात थेट...
मोहक मृद्गंध देऊन जातोस भेट...
अवेळी अचानक असं येणं तुझं
आताशा झालयं नित्याचंच...
तुला हवं तेव्हा तू असं समोर येऊन
मला मात्र असं ताटकळत ठेवायचं...
