STORYMIRROR

Himani Kulkarni

Others

5.0  

Himani Kulkarni

Others

आठवण

आठवण

1 min
557


हळूच चोरपावलांनी तुझी आठवण येते...

साहजिकच तुझ्या आठवणीत

माझ्या मनाची पाठवण होते!

काय रे देवा, या आठवणी कशा काय येतात?

हळूच येऊन मनाला हुरहूर लावून जातात!

या धावपळीच्या जगात विसाव्यासाठी

तुझी एक आठवण पुरेशी असते...

आपल्या सहवासाच्या क्षणांमध्ये

रमण्यासाठी वेळेचे बंधन नसते!

त्या भूतकाळाच्या क्षणांमध्ये

मन आपसूकच रमते...

थोडासा जरी विरह झाला

की मग तुझ्यासाठी रडते!

दूर राहून काय नी लांब राहून काय

आठवण ही आठवणच असते...

तुझ्यापासून विरह झाल्यावर

त्या आठवणींवर मन कसे बसे जगते!


Rate this content
Log in