पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
153
काळे काळे मेघ नभी गर्द दाटले
वाऱ्यासही येण्याचे संदेश भेटले
घेत चाहुली लोळ धुळीचे उठले
पाऊस आगमनी साज सारे थाटले -1-
मृद्गंध भारावे, अनोखे वाटले
ओलावता आसमंत देणे फिटले
पाणवठी ये चर कुठले कुठले
तृष्णा शमन श्रेया भलते लाटले -2-
प्रथम बरसल्या सरींनी बाटले
अंग अंग सारे रोमांचित पेटले
येता वर्षा प्रश्न जगण्याचे मिटले
देत दिलासा ऋतू संचित वाटले -3-