STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
239

तप्त उन्हाच्या कहरात 

हवा शोधून मिळेना  

काळे मेघ हे दाटले 

साऱ्या सृष्टीची केली दैना  


काळा अंधार दाटला  

वीज जोराने कडाडली 

ढगांचा ढोल वाजला 

सारी सृष्टी आनंदली  


गार वाऱ्याच्या जोडीला 

पावसाच्या सरी आल्या 

डोंगर, नदी, झाडे-वेली 

साऱ्या न्हाऊन निघाल्या  


पहिल्या पावसाच्या सरीने

सुगंध मातीचा सुटला 

झाला आनंद मनाला 

पहिला पाऊस धरतीला  


खूप आशा पालवल्या 

तुझ्या खुशीत येण्याने

सारे जीव आनंदले 

तुझ्या पहिल्याच आगमनाने  


झाले स्वागत प्रेमाने 

ताप सृष्टीचा निघून गेला

गार वाऱ्याच्या झुळकीने 

जीव सृष्टीचा सुखावला  


झाडे हिरवीगार बहरली 

नयन मानवाचे सुखावले 

त्यांच्या सुखद आनंदाने 

दुःख जगाचे मिटविले


Rate this content
Log in