पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
211
अंगणी बरसणारा
चिंब भिजवणारा
प्रेम व्यक्त करणारा
तोच पहिला पाऊस..... ||१||
अंगी शहारे आणतो
मन प्रसन्न ठेवतो
सर्वांना आनंद देतो
तोच पहिला पाऊस..... ||२||
शब्द माझे फुलवितो
सोबतीला चहा घेतो
धरनी भेटण्या येतो
तोच पहिला पाऊस..... ||३||
प्रेमाची साद घालीतो
आठवणी उजळीतो
एका छत्रीत बांधितो
तोच पहिला पाऊस..... ||४||
