STORYMIRROR

yuvaraj jagtap

4  

yuvaraj jagtap

पहिला पाऊस (मुक्तछंद )

पहिला पाऊस (मुक्तछंद )

1 min
41.6K


धगधगता सूर्य

ओकत होता आग 

उष्ण झळांचा तर 

मनोमनी खूप आला राग

अचानक वाऱ्यांनी 

घातली साद 

साद कसली ती 

ते तर अवचित

आलेलं तुफान वारं

उलथून टाकली त्यानं

क्षणात सगळी 

झाडं अन घरं

वादळ वाऱ्याचे ते 

अक्राळ विक्राळ रूप 

पाहून मी भेदरलो 

वाऱ्यामुळे ढगांची 

आकाशात जमली गर्दी

शांत झालेल्या त्या 

वाऱ्याने जणू आणली 

पावसाची वर्दी

आतापर्यंत आग 

ओकणार रवी 

ढगाआड लपला कधी

हे समजलचं नाही 

भर दुपारी 

काळरात्र झाल्याचाच 

भास होत होता 

वाऱ्याचा वेग कमी 

झाला तेवढ्यात 

ढगांनी गर्जायला 

सुरुवात केली 

डोळ्यांच्या समोर 

वीजांनी नाच सुरू केला 

ढगांचा गडगडाट 

अन 

विजांचा थयथयाट 

उरात भीती भरत होता

पत्र्यांवर ताशांचा आवाज 

व्हावा तसे थेंब पडू लागले

थेंब कसले ते 

जणू खड्यांचा मारा

पावसाच्या सारी कोसळल्या 

सरी कसल्या त्या 

पाऊस तो मुसळधार

हाच तो पहिला पाऊस 

याच त्या पहिल्या पावसाच्या

पहिल्या सरी 

पहिल्या पावसाच्या 

सरी कोसळल्या 

अन 

धरणाची धग झाली कमी 

धारणीही झाली 

तृप्त अन शांत 

पहिल्या पावसाचा

ही झाला अंत


Rate this content
Log in