STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

पहिला पाऊस-कविता

पहिला पाऊस-कविता

1 min
477

पहिला पाऊस-कविता 

  कवी-संजय रघुनाथ सोनवणे  

तप्त उन्हाच्या कहरात 

हवा शोधून मिळेना  

काळे मेघ हे दाटले 

साऱ्या सृष्टीची केली दैना  


काळा अंधार दाटला  

वीज जोराने कडाडली 

ढगांचा ढोल वाजला 

सारी सृष्टी आनंदली  


गार वाऱ्याच्या जोडीला 

पाऊसाच्या सरी आल्या 

डोंगर, नदी, झाडे वेली 

साऱ्या न्हाऊन निघाल्या  


पहिल्या पाऊसाच्या सरीने

सुगंध मातीचा सुटला 

झाला आंनद मनाला 

पहिला पाऊस धरतीला  


खूप आशा पालवल्या 

तुझ्या खुशीत येण्याने

सारे जीव आनंदले 

तुझ्या पहिल्याच आगमनाने  


झाले स्वागत प्रेमाने 

ताप सृष्टीचा निघून गेला

गार वाऱ्याच्या झुळकीने 

जीव सृष्टीचा सुखावला  


झाडे हिरवीगार बहरली 

नयन मानवाचे सुखावले 

त्यांच्या सुखद आनंदाने 

दुःख जगाचे मिटविले


साहित्याला गुण द्या
लॉग इन