STORYMIRROR

Shubhangi H. Kore

Others

3  

Shubhangi H. Kore

Others

पहाट

पहाट

1 min
998

उसळणार आहे कधीतरी 

माझ्या कतृत्वाचा निद्रिस्त ज्वालामुखी 

दारिद्रयाच्या आगीत होरपळलेल्या 

भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना एकसंध बांधून ,

ध्येयाचे गरूडपंख पसरून 

मी ही झेपावणार आहे क्षितिजाकडे 

म्हणूनच तर सारं निमूटपणे 

सहन करतोय डोळे मिटून ...


विचारांचं वादळ वाहतय मनात अन् 

भूकेचं वादळ घोंघावतय पोटात 

म्हणून माणसाने उकिरड्यावर फेकलेल्या कच-यात 

शोधतोय मी माझा सात्विक , पोषक आहार

अन् त्याचबरोबर शोधतोय माझं भविष्यही ...


शेवटच्या क्षणी माझ्या मायने थरथरत्या 

हाताने दिलेला प्रेमळ आशीर्वाद 

अन् ती गेल्यानंतर उरलेली 

माझ्या अस्तित्वाची लक्तरे 

केव्हाशी जतन करून ठेवलीत मी उराशी 

कारण माझ्याही आकांक्षांची 

होणार आहे पहाट केव्हातरी 

होणार आहे पहाट केव्हातरी ...


Rate this content
Log in