STORYMIRROR

काव्य चकोर

Others

3  

काव्य चकोर

Others

पहाट पावसाळी

पहाट पावसाळी

1 min
488

सरी मोत्यांच्या गुंफत

आली पहाट अंगणी

पाखरांच्या चोचीतली

चिंब चिंब झाली गाणी..!!


खिडकीत डोकावतो

गार अवखळ वारा

अंगअंगास झोंबतो

थेंब थेंब निलाजरा..!!


गोड शहारा उठतो

अंगी रोमांच फुलतो

सुमनांच्या देहातून

गंध वेडापिसा होतो..!!


असा पहाट देखावा

भूल डोळ्यास पाडतो..

सृष्टीवर पावसाचा

जीव वेडा रे जडतो..!


Rate this content
Log in