STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

3  

Stifan Khawdiya

Others

पैलवान

पैलवान

1 min
733

पैलवान पैलवान 

महाराष्ट्राचा तु मान

पिळदार शरीर मजबूत 

मर्दाना तुझी शान..


ओठांवर झुपकेदार मिशी  

शोभते पैलवाना तुला कशी 

गावाचा अभिमान तु गड्या

ताकतीची खाण तशी.. 


मनगटात तुझ्या जोर

लाल मातीतला राजा तु शुर

पठ्याना करतो क्षणात चित

तुझी शक्ती रे धारदार..


साक्ष देत तुझी पैलवानगी 

पदोपदी प्रत्येक तरुणाला

नाही गर्व,आरोग्यचा देतो मंत्र

व्यायामाचे महत्व शरीराला..


गौरव तुझा उद्धार मानवाचा

हरएक गावात पैलवान जन्मावा

भारतात कुस्तीच्या क्षेत्रात 

पैलवाना तुझा इतिहास घडावा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन