पायी चालत होतो
पायी चालत होतो
1 min
355
नागमोडी रस्त्याची वळणे
मी पायदळी तुडवीत होतो
कसलीच तमा न बाळगता
मी पायीच चालत होतो ।।1।।
प्रवास होता खुपच
लांब आणि खडतर
मात्र ध्येय गाठण्यासाठी
मी पायीच चालत होतो ।।2।।
पायी प्रवास होईल
यशाचा खात्री होतीच
कष्टाने फळ मिळे
कष्ट झेलत मी प्रवास पायी करत होतो. ।।3।।
