पावसात भिजताना..!
पावसात भिजताना..!
1 min
232
आज मी अचानक
तुला असे *पाहिले,*
भाव मनीचे माझे
मला कळून *चुकले.*
पावसात भिजताना
तुझे भान *हरपले,*
पाऊसधारा झेलूनी
मन चिंबचिंब *झाले.*
भिजताना पाहिले
यौवन तुझे *ओले,*
निसर्ग सांगून गेला
प्रितीचे रंग *उधळले.*
तुला पाहुनी जागल्या
पुन्हा त्या *आठवणी,*
सहवास तुझा पुन्हा
मिळो हिच *विनवणी.*
चातकाला ओढ पावसाची
तशी मला *सहवासाची,*
पावसात भिजताना येते
आठवण तुझ्या *प्रेमाची.*