STORYMIRROR

Sunita Yeole

Others

3  

Sunita Yeole

Others

पावसाची ओढ

पावसाची ओढ

1 min
101

धरणीस लागे पावसाची ओढ

फुलण्याची मनी हुरहूर गोड....

थट्टेची तुजला भारीच खोड

चेष्टा पुरे तुझी लागली रे ओढ....


पावसाच्या सरींची वाट पाहे रान

मेघ पाहे आसवून गवताचे पान....

अंकुरही पाहे उंचावून मान

पावसाला मागे जीवनाचं दान....


सृष्टीलाही पावसाची आस

दुभंगून काया फुलला श्वास....

पावसाची ओढ लागे चराचरांस

बहरुनी सुखवायचं त्याला जगास....


पावसाची ओढ लागे बळीराजाला

मनसोक्त वर्षूनी फुलू दे शिवाराला....

तुझीच रे ओढ चातकाच्या तृष्णेला

थुईथुई नाचण्यास पक्षीराज मोराला...


Rate this content
Log in