ओढ मनाला पावसाची
ओढ मनाला पावसाची

1 min

64
निळ्या आकाशात रेखाटली काळया ढागंची नक्षी
भवविभोर होऊनी उडू लागला मम मनाचा पक्षी ||
मनातल्या चातकाला लागलीय ओढ पावसाची
रिमझिम पावसाचे थेंब पिऊन तृप्त होण्याची
वाटे होऊनी मोर पिसारा मनाचा फुलवावे
अन् जलधारांसवे बेधुंद होऊन मी नाचावे
मनाच्या भूमीस हवे हिरव्या सुबत्तेचे लेणे
नखशिखांत बहरुनी वाटावे आनंदाचे देणे
अनिवार ओढ पावसाची अशी लावी वेड जीवा
फुलूनी सौख्याचा सहवास वाटे नित्य हवा हवा
ओढ पावसाची लावी अनामिक हुरहूर
येता आठवणी दाटून वाहे आसवांचा पूर