मुलगी वाचवा
मुलगी वाचवा
1 min
261
दुर्गा गौरी लक्ष्मी सह
कन्या शक्तिरूप खरी
जग बघू द्या लेकीला
नका संपवू उदरी..||
नका मानू कन्यारत्ना
तुम्ही परक्यांचं धन
लळा लावूनी तुम्हास
तीच जिंकेल हो मन..||
कर्तृत्वान उजळू दया
चराचर, दाही दिशा
गोड भावाच्या राखीची
नका संपवू हो आशा..||
ज्याच्या पोटी ये मुलगी
तोच खरा भाग्यवान
झेप घेई ती आकाशी
वाढे घराण्याचा मान..||
हर एक क्षेत्रामध्ये
मुली आता अग्रेसर
नका विसरु हो तिचा
जगण्याचा अधिकार..||
ऐका ऐका जग सारे
साद मुलगी वाचवा
भविष्यात जन्मासाठी
कूस आईची वाचवा..||
