STORYMIRROR

Sunita Yeole

Others

3  

Sunita Yeole

Others

बालपण फिरुनी परत यावे

बालपण फिरुनी परत यावे

1 min
156

अजूनही वाटे आईच्या कुशीत शिरावे

दादांपाशी बसून मी परवचा म्हणावे

हळूच चुकवून डोळा आईचा खेळाया पळावें

दुरून दिसत दादा गुपचूप येऊन बसावे

     बालपण माझे फिरुनी परत यावे...।।धृ।।


आईचा ओरडा खलमानेने निमूटपणे ऐकावे

सणावाराला गल्लीभर रांगोळ्या मांडीत फिरावे

लहान म्हणत सतत ताईची मदत घेतच राहावे

भावास खेळविण्याच्या नावे स्वतःच खेळत बसावे

     बालपण माझे फिरुनी परत यावे ... ।। १।।


बसुनी संगतीने आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकावे

आजीचे अनुभवविश्व गाठोडीत घट्ट बांधून घ्यावे

आत्या काकाकडून मनसोक्त लाड करवून घ्यावे

जमुनी सर्व भावंडे खूप खूप दंगा- मस्ती करावे

      बालपण माझे फिरुनी परत यावे...।।२।।


अधाशासारखे वाचत दादांना नवनवी पुस्तके मागावे

जमवून मित्रमेळा नाच गाणे चित्रे यात रमून जावे

निसर्गाच्या ओढीने शेतावर येण्याचा हट्ट धरावे

मौज लुटून थकले म्हणत बैलगाडीने परत फिरावे

     बालपण माझे फिरुनी परत यावे... ।।३।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍