जीवनमळा
जीवनमळा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आईची माया
पित्याची छाया
पुरेशी नक्की आहे
जीवन घडाया।।
आईने ओतली
संस्कारांची शिदोरी
बापाच्या बोलण्यातून
जीवनाची उभारी।।
आईने रुजविलं
सामर्थ्य प्रेमाचं
बापाने शिकविलं
बळ लढण्याचं।।
हित घराचं जपण्याचं
आईनं दिलं भान
मनाच्या मोठेपणाचं
वडीलांनी दिलं दान।।
बऱ्या वाईटाची जाण
उतरवली तुम्ही गळा
म्हणूूूनच तर शोभतोय
आमच्या जीवनाचा मळा।।