STORYMIRROR

Sanjeev Borkar

Others

4  

Sanjeev Borkar

Others

पाऊस

पाऊस

1 min
403

चिंब चिंब पाऊस आला

माझ्या मनाला

गारवा देऊन गेला......! धृ !


किती किती वाट पाहिली मी चातकापरी

तरी कधी ना कोसळल्या या वेड्या सरी

आज वारा, बेभान झाला

माझ्या मनाला गारवा देऊन गेला

चिंब चिंब पाऊस आला ....  !१!


किती किती नाजूक थेंब हे जणू दाणे मोत्याचे

झेलावे ओंजळीत भाव हे मनामनाचे 

आज गंध मातीला कस्तुरीचा, स्पर्शून गेला

माझ्या मनाला गारवा देऊन गेला

चिंब चिंब पाऊस आला ..... !२!


कसे कसे झेलावे तुझे हे नाजूक हिमतुषार

आज उठले कसे रोमांच नाजूक देहावर

सागरी लाटांचा वर्षाव झाला

माझ्या मनाला, गारवा देऊन गेला

चिंब चिंब पाऊस आला.......!३!


साहित्याला गुण द्या
लॉग इन