STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

पाऊस

पाऊस

1 min
230

आजही मला आठवतो

छत्री नसताना भिजवतो

वाऱ्यासंगे जोरात येतो

तो पाऊस

शेतीची मशागत करतो

शेतकरी वाट पाहतो

तरी ही ना बरसतो

तो पाऊस

गरजेच्या वेळी लपतो

मदतीच्या वेळी रुसतो

डोळ्यातून अश्रू गाळवितो

तो पाऊस

तोंडातले घास हिरावतो

शेतात पिकं नासवतो

सर्वांचे नुकसान करतो

तो पाऊस

प्रतीक्षा करायला लावतो

अवेळी येऊन वाट लावतो

आठवणीत सदा राहतो

तो पाऊस


साहित्याला गुण द्या
लॉग इन