पाऊस
पाऊस
1 min
277
असा कसा रे पावसा बरसलास
समजावून सांगशील का रे काही खास
मी बरसलो आहे पहिल्या प्रेमाच्या भेटीसाठी
मी बरसलो आहे मुलांच्या खेळण्या बागडण्यासाठी
मी बरसलो आहे चहा बरोबर कांदाभजीचा आस्वाद घेण्यासाठी
मी बरसलो आहे माणुसकी जपण्यासाठी
मी बरसलो आहे समाजाच्या बांधीलकीसाठी
मी बरसलो आहे निसर्गाच्या महतेसाठी
मी बरसलो आहे एका निखळ मैत्रीसाठी
मी बरसलो आहे एका विरहाचे सांत्वन करण्यासाठी
असा हा पाऊस मी बरसतो
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कारणासाठी
