पाऊस-पाऊस
पाऊस-पाऊस
1 min
247
आला पाऊस पाऊस
बरसल्या जलधारा
मृद्गंध वाहून सुखाचा
तृप्त जाहली वसुंधरा
नदी-नाले, डोंगर,झरे
उत्साहाने आनंदले
काळ्या मातीच्या कुशीत
उद्याचे बीज अंकुरले
जंगलातील वृक्षांनीही
साजरा केला सोहळा
आनंदाने डोलूनीया
नाहला सुखात पावसाळा
पक्षी गाई गोड गाणी
मेघ दाटले काननी
कोकीळेचा मंजूळ स्वर
घुमला रानी-वनी
भेगाळल्या धरणीला
भेटला मायेचा ओलावा
हिरवा साज लेवूनीया
क्षण असाच डोलावा
पाऊस हा साऱ्यांना
किती गेला सुखावूनी
निसर्गाच्या रूपाला
शितलधारेत न्हाऊनी
